-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

रिटेवाडी व केत्तूर उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा; शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती

जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल!!!

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

रिटेवाडी उपसा सिंचन योजना व केतुर उपसा सिंचन योजना या दोन योजनेमार्फत करमाळा तालुक्यातील जवळपास २४२६२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. असा अहवाल सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांनी दिला असल्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागण्याची तांत्रिक अडचण दूर झाली असून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक लावून ठोस निर्णय घेण्याची भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करा असे आदेश कुकडी प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना दिले होते. प्रकल्प अधिकारी श्वेता पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे. उजनी धरणात कुकडी प्रकल्पातून वाहून येणारे चार टीएमसी पाणी करमाळा तालुक्याला देण्यास शक्य आहे.

 

याशिवाय रिटेवाडी ते विहाळ हे अंतर ६ किलोमीटर असून १००० मिलिमीटर च्या दोन पाईपलाईन मधून दोन हजार एचपीचे सहा विद्युत पंप बसवून रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करण्यास हरकत नाही असाही अहवाल दिला आहे. शिवाय केतुर ते सावडी हे अंतर १७ कि.मी. असून केतुर येथील पाणी उचलून ते १५०० मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईन मधून १००० एचपी क्षमतेचे चार विद्युत पंप बसून ही योजना सुरू करण्यास हरकत नाही.

 

या दोन्ही योजनेतून करमाळा तालुक्यातील जवळपास ५० गावातील २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. असा अहवाल ही कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून हा प्रकल्प अहवाल गुगलच्या माध्यमातून केला असून प्रत्येक ठिकाणचे पाणीसाठा व कॅनलची उंची याची मोजमाप करण्यात आले आहे.

 

पण हा सर्व प्रश्न धोरणात्मक असल्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा. असा अहवाल जलसंपदा विभाग पत्र क्र. १८६६ दि. २६ एप्रिल २०२३ प्रमाणे दिला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

 

या योजनेबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे आता रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसह केतुर उपसा सिंचन योजनेला सुद्धा गती मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पासंदर्भात तात्काळ मंत्रालयात बैठक घेऊन करमाळा तालुक्याला न्याय देतील असा विश्वास मला वाटतो.

महेश चिवटे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

 

ही योजना पूर्ण झाली तर मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी राहील. जवळपास २० ते २५ गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. शिवाय मांगी प्रकल्पा लगत असलेल्या करमाळा एमआयडीसीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठे उद्योग येऊन रोजगाराच्या संधी वाढतील. यामुळे या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाने तांत्रिक मंजुरी तात्काळ दिल्यास खऱ्या अर्थाने तालुका सुजलाम सुफलाम होईल.

सुजित बागल, प्रगतशील शेतकरी, मांगी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close