-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

पुर्वभागातील प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेचे आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन! महत्वपूर्ण प्रश्नांवर वेधले लक्ष 

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पुर्वभागातील जनहिताच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळेस शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे जेष्ठ पत्रकार विवेक येवले उपस्थित होते.

 

या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील पुर्वभाग हा कायमच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सिना कोळगाव धरण झाल्यानंतर गेल्या तिन वर्षांपासून सातत्याने धरण ओव्हर फ्लो होत असल्याने काही गावे ओलिताखाली आल्याने दिलासा मिळत आहे. मात्र या भागावर राज्यकर्त्यांच्या कृपादृष्टीचा दुष्काळ मात्र हटताना दिसत नाही.कोण जरी आमदार झाले तरी या भागातील शेतकऱ्यांशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून आहे त्याच परस्थीत आहेत. हे प्रश्न आपल्या कारकीर्दीत तरी मार्गी लागावेत यासाठी पुर्वभागातील महत्वाचे प्रश्न आपल्यासमोर या निवेदना द्वारे अधोरेखित करत आहोत त्या प्राधान्याने लक्ष घालून सोडावावेत.

 

   १ ) पुर्वभागातील हिवरे ,हिसरे कोळगाव निमगाव गौंडरे या गावांना जोडणारा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.या मधील निमगाव ते गौंडरे हा रस्ता प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतुन पुर्ण होत आहे. याच रस्त्याला हिसरे येथु हिवरे कोळगाव ते निमगाव जाणाऱ्या रस्त्यावर मुख्यमंत्री टप्पा दोन मधुन ८ कोटी 86 लाख रू निधी मंजूर झाला आहे मात्र हिवरे ,कोळगाव निमगाव ला वगळून हा रस्ता हिसरे येथुन थेट गौंडरे ला जाणार असल्याने 12 ते 13 हजार लोकवस्ती ,शेकडो विद्यार्थी ,हजारो प्रवाशी यांची गैरसोय करून एक ही लोकवस्ती शाळा, मंदिर नसलेल्या मार्गावर हा करडो रूपयांचा निधी अनाठायी पद्धतीने खर्च होणार आहे.त्यामुळेच हा प्रस्ताव रद्द करून मुख्य रहदारीच्या म्हणजे हिवरे ,कोळगाव निमगाव या रस्त्यावर हा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करून नव्याने मंजुरी घ्यावी. 

 

       २) हिसरे येथील पुलाची उंची वाढवावी व हिवरे येथील रस्त्यावरील खड्डे ,पुलावरील खड्डे बुजवून घ्यावेत यासाठी आंदोलन केल्यानंतर 35 लाख रू निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हापरिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे, मात्र अजून कोणतेच काम सुरु नाही पावसाळ्या आगोदर हे काम पुर्ण केले जावे.

 

    ३) अर्जुननगर येथील पुलावरून मोठ्मोठ्या ओढ्याद्वारे पाणी येते त्यामुळे तो देखील पुल ओव्हर फ्लो होत असल्याने या पुलाची उंची वाढवुन विस्तारीकरण करावे.

 

     ४) गहिनीनाथ गड येथील श्री संत वामनभाऊ महाराज देवस्थानची 25 ते 30 हजार वारकरी असलेली दिंडी आषाढी वारी निमित्त मिरगव्हाण, हिवरे ते सालसे या मार्गे जात असते मात्र मिरगव्हाण ते हिवरे दरम्यान असलेल्या सिना धरणाच्या फुगवट्या मुळे चिखल पाण्यातुन रस्ता तुडवत वयोवृद्ध वारकऱ्यांना चालावे लागत आहे त्यामुळे मिरगव्हाण, हिवरे ,सालसे या मार्गाला पालखी मार्गाचा दर्जा देऊन संपूर्ण रस्ता दुरुस्त करण्यात यावा.

 

    ५) सिना कोळगाव धरणावरील पाण्याचा लाभ होण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे कॅनॉल झाले आहेत मात्र हिवरे हिसरे,सालसे या भागातील कॅनॉल चे जमीन संपादन होवुन देखील शेतकऱ्यांना कोणताच मोबदला मिळालेला नाही तसेच, अजून या कॅनॉल मध्ये पाणी येत नाही यासाठी पाठपुरावा करण्यात यावा व सध्या असेल्या कॅनॉल मधून हिवरे हिसरे गौंडरे, तलावात पाणी सोडण्यात यावे.

     ६) कोळगाव सबस्टेशन वरील 3/15 ट्रान्सफार्मर हा सतत नादुरुस्त होत आहे सध्या महावितरण कडुन दोन वेळा मोठ्याप्रमाणात वसूल झालेला आहे त्यामधुन हा ट्रान्सफार्मर 5 / mv चा करावा. तसेच नुकतेच आपल्या हस्ते भूमिपूजन झालेल्या आवाटी सबस्टेशन चे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन घ्यावे व कोळगाव सबस्टेशन वरील लोड कमी करुन या भागातील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा. 

    ७) करंजे ते मिरगव्हाण या भागातील मांगी प्रकल्पाचा कॅनॉलची “असून अडचण नसून खोळंबा” आशी परस्थीती झाली आहे .सिना कोळगाव धरणात पाणी असल्याने करंजे पासुन पुढे शेतकऱ्यांकडून हा कॅनॉल अनेक ठिकाणी बुजवून टाकला आहे .दरवर्षी संबंधित विभागाकडून कॅनॉल पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च केला जातो.या ऐवजी संपूर्ण कॅनॉल अस्तरिकरण करून कॅनॉल पट्टीवरील रस्ता खडीकरण किंवा शक्य असल्यास डांबरीकरण करुन घेण्यात यावा जेणेकरून करंजे,मिरगव्हाण, हिवरे,भालेवाडी या शिवारातील शेतकऱ्यांना उसवाहतुक तसेच शेतीची कामे करणे सोपे होईल. 

    ८) सौंदे ते फिसरे , गुळसडी ते देवळाली या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली असून या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. 

     ९) भालेवाडी गावातील पाण्याची टाकी नादुरुस्त असल्याने अनेक दिवसांपासून पाणी टंचाई सामना करावा लागत आहे.नदी तीरावर गाव अताना पाणीटंचाई असणे हा प्रकार गंभीर असून याची दखल घेऊन पाणी प्रश्नावर तोडगा काढावा.

    १०) श्री नागनाथ देवस्थान मंदिरास तीर्थ क्षेत्र निधीतुन सर्वसोयीयुक्त भव्य असे भक्तनिवास बांधणीस निधी उपलब्ध करण्यास पाठपुरावा करावा.

      ११) कोर्टी ते आवाटी रस्त्याचे कामकाज करत असलेल्या एन पी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अवजड पद्धतीने मुरुम खडी वाहतूक केल्याने सौंदे, शेलगाव, साडे,गुळसडी या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून सदर कंपनीकडून हा रस्ता दुरुस्त करून घेण्यात यावा. अशा विविध महत्वपूर्ण मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. 

या निवेदनाचा विचार करून पुर्व भागातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close