-->
कृषी विषयकदेशराज्य

धक्कादायक.! गोळी पोटॅश नावाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दररोज करोडो रुपयांची फसवणूक

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

रासायनिक खताच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यातच म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. तीन महिन्यापूर्वी एक हजार रुपयाला मिळणाऱ्या ५० किलोच्या पोत्याची किंमत तब्बल एक हजार आठशे रुपये झाली आहे. प्रत्येक पोत्यामागे आठशे रुपयाची वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना पोटॅश खत वापरणे मुश्किल झाले आहे. याचाच फायदा घेत काही कंपन्यांनी गोळी पोटॅश या नावाने बनावट खत बाजारात विकण्याचा झपाटा लावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोळी पोटॅश या नावाने शेकडो कंपन्या दर महिना ५० हजार मेट्रिक टन हे बनावट खत विकत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

या बनावट गोळी पोटॅश खताच्या पोत्याची खरेदी किंमत ३०० रुपये प्रति बॅग असून गोणी शेतकऱ्याला तब्बल ८०० रुपयाला विकली जात आहे. बाजारात कोणतेही पोटॅश नाही, यामुळे या गोळी पोटॅशचे महत्व पटवून शेतकऱ्यांच्या गळ्यात हे खत मारले जात आहे. एक गोळी पोटॅश खताच्या विक्री मागे तब्बल ५०० रुपये फायदा होत असल्यामुळे बहुतांश रासायनिक खत विक्रेते याचा छुप्या मार्गाने विक्री करत आहे. या खताची केंद्राच्या रासायनिक खत विक्री यादीत नोंद नाही यावर कोणाचेही कसलेही कंट्रोल नाही.

 

युरिया, 10:26:26, 15:15:15, सम्राट अशी दर्जेदार खते विक्रीसाठी असताना विक्रेते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या गळ्यात दोन ते तीन पिशव्या खत देत आहेत. केंद्रशासनाने रासायनिक खत विक्रीसाठी देण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीनवर या खताची नोंद नसल्यामुळे खत आले किती.? गेले किती.? याचा मेळ लागत नाही. 

 

गोळी पोटॅश प्राधान्याने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, विदर्भातील काही कारखाने यामध्ये तयार करून पाहिजे त्या नावाने पिशवीत भरून महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी दिले जाते. या गोळी पोटॅश चे नमुने काही शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये केवळ फरशी पॉलिश केल्यानंतर कारखान्यातील उरलेली राख असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ऊस केळी कांदा सर्वच पिकांसाठी पोटॅश खताची आवश्यकता असते. पोटॅश हे खत भारतात तयार होत नाही. हे खत संपूर्ण बाहेर देशातून आयात करावे लागते. गेल्या सहा महिन्यापासून कोणत्याही कंपनीचे पोटॅश खत बाहेर देशातून आयात झालेले नाही. या खताच्या प्रचंड टंचाई चा फायदा घेत आज ग्रामीण भागातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रातून गोळी पोटॅशची विक्री करून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. शिवाय या खतामुळे कोणतीही उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान होत आहे. खर्च वाया जातो, उत्पन्नात वाढ होत नाही, मजुरी वाया जातील, पर्यायाने या सर्व प्रकारामुळे देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 

गोळी पोटॅश खत हे नेमके काय आहे? याचा खुलासा सुद्धा आता संबंधित कंपन्यांनी करणे गरजेचे असून यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

गेली सहा महिने पासून बाजारामध्ये पोट्याश उपलब्ध नाही कृषी सेवा केंद्रात गेले असता गोळी पोटात घेण्याची बळजबरी केली जाते हे गोळी पोटॅश खत मी पाण्यात टाकून बघितले पूर्णपणे ती राख असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुजित बागल, मांगी कांदा उत्पादक शेतकरी

 

सध्या बाजारात म्युरेट ऑफ पोटॅश खतांची टंचाई आहे गोळी पोटॅश या नावाचे खत नसून असे खर्च कोणी विकत असेल तर त्यांनी त्या विक्री त्यांची नावे तालुका कृषी खात्याकडे दैवत आम्ही कायदेशीर कारवाई करू.

संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी, करमाळा

 

देशात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात पोटॅश आयात करणारी करणारी इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनी आहे सध्या पोटचे शॉर्टेज आहे ओरिजनल पोटॅश पांढरेशुभ्र बारीक मिठासारखे असते. ते पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळते. कोणत्या पोटॅश बद्दल शंका वाटल्यास त्यांनी आमच्या कंपनीशी संपर्क साधावा.

श्री. चव्हाण साहेब,   मार्केटिंग अधिकारी इंडियन फोटोस लिमिटेड, पंढरपूर

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close