
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील शिवभक्तानी ३९२ वी शिवजयंती पालखी सोहळा मोठया उत्साहात साजरा केला. प्रथमता सकाळी शिवशंभो वेशीवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुजा शिवभक्तांनी केली. यानंतर सजवलेल्या पालखीत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात पाथुडी येथील ह.भ.प. स्पनील महाराज व भजनी मंडळ या सोहळ्याला सहभागी झाले होते.
या सोहळ्यात शिवभक्तांनी हातात भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत होते. या पालखी दिंडी सोहळा मध्ये शिवकिर्ती इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. पालखी गांधी चौकात आल्यावर विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचा शिवबा या गाण्यावर उत्कृष्ट असे नृत्य केले. याचे शिवभक्तानी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी हा खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात गर्दी केली होती. महाराजांची पालखी शिवशंभो वेसीवर आल्यानंतर पालखी मिरवणूकीची सांगता झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.



