केम प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील केम येथील सुप्रसिध्द कुंकू वाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना भुरळ घातली आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई च्या पुजेसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सोबत रश्मी ठाकरे या पंढरपूरला आल्या होत्या. या प्रसंगी त्यानी केम येथील सुप्रसिध्द हळदी पासून तयार होणाऱ्या कुंकूवाला ऑर्डर दिली असून ही सोलापूर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. केम येथे पुरातण काळापासून पिढ्यान् पिढ्या कुंकू तयार करण्याची अंखड पंरपरा सुरू आहे. प्रत्येक वारीच्या निमित्ताने रखुमाईला केमच्या कुंकूवाने मळवट भरण्याची पंरपरा आहे. शुध्द हळदी पासून पारंपारिक पद्धतीने केम येथे कुंकू तयार करण्याची अंखड पंरपरा सुरू आहे. या व्यवसायासाठी अकुशल कामगार चालतात. पूर्वी दगडाच्या मोठ्या जात्यावर हे कुंकू महिला दळत होत्या परंतु आता यांत्रिक पद्धतीने कुंकू तयार केले जाते. या कुंकू वाला गंधा बरोबरच एक वेगळा रंग आहे. त्यामुळे केमच्या कुंकूवाला देशभरातून चांगली मागणी आहे. केमचे कुंकू आता रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्व. मीनाताई ठाकरे यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबरोबर मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थाना पर्यत पोहचले आहे. ही सोलापूर जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.
केम येथील कुंकू निर्मिती उद्योगामध्ये इतिहास आहे. कुंकू निर्मिती सोबत केमचे जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिर ही आहे. केम परिसरात असणाऱ्या धार्मिक वास्तूंमुळे केम ला ऐतिहासिक पुरातण पार्श्वभूमी आहे. केम येथे पार्वती माते कडून कुंकू सांडले होते. त्यामुळे केम येथे कुंकू निर्मिती होते. अशी पुराण कथा आहे.
दळण वळणा अभावी केम येथील उद्योग टेंभूर्णी, जेजुरी, यवत, पंढरपूर, तुळजापूर आदी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. केम येथून एकही राज्य मार्ग किंवा महामार्ग गेलेला नाही. येथील कुंकूवाच्या उद्योगाला चालना देण्यासाठी केम येथे रेल्वे उड्डाणपूलाची गरज आहे. आता रश्मी ठाकरे यांनी केमच्या कुंकू वाला ऑर्डर दिल्यामुळे त्या स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांना सांगितल्याने रेल्वे उड्डाणपूलाचे चार प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. मी पण ऊध्दवजी ठाकरे साहेबांना रेल्वे उड्डाणपूलाचे निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष
अनिरुद्ध कांबळे




