
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सालसे ता. करमाळा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आज सोमवार दि. ०५ सप्टेंबर २०२२ रोजी गणेशोत्सव व शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वराज्य युवा प्रतिष्ठान व दादाश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश भाऊ करे-पाटील, पर्यावरण देवराईचे मार्गदर्शक श्री. रघुनाथराव ढोले पाटील तसेच न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. रवींद्र सपकाळ सर हे उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपण उद्योजक नितीन शेठ सपकाळ, सुनील शेठ कदम
(दोघेही संभाजीनगर), जनशक्ती शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र राणा वाघमारे, अभिनव भारत समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष राऊत, दादाश्री फाउंडेशन चे अध्यक्ष काकासाहेब काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम भाऊ सपकाळ यांनी केले. यावेळी सालसे येथील वैभव घाडगे, जालिंदर शिंदे, लहू येवले, तानाजी लोकरे, रावसाहेब काळे, गोपीनाथ येवले, संदीप विटकर, सौरभ काळे, गणेश निंबाळकर, युवराज काळे तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते सर यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. लावंड सर यांनी मानले.




