-->
करमाळाक्राईमविशेषसामाजिक

केम पोलीस चौकीत हिंदू-मुस्लीम यांच्यासह सर्व समाज बांधवांची शांतता बैठक संपन्न

 

केम /प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील केम येथील पोलिस चौकीमध्ये केम पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम बांधवांसह सर्व समाज बांधवांची शांतता बैठक करमाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री. प्रवीण साने साहेब यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पायघन साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल बचुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

 

यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्री. प्रवीण साने साहेब यांनी सर्व ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. यावर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्वांनी सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करून सर्वांनी गुण्या गोविंदाने रहावे असे आवाहन पोलीस उप निरीक्षक श्री. साने साहेब यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close