-->
करमाळाकृषी विषयक

कमलाभवानी साखर कारखान्याचा ७ वा गाळप हंगाम शुभारंभ; ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त को-८६०३२ या जातीच्या उसाची लागण करून साधारण १४ ते १५ महिन्यानंतर ऊस गाळपास पाठवावा. यंदाचा गाळप हंगाम साधारण १४० दिवस चालणार असून प्रतिदिन ६ हजार मे. टन गाळप करून यावर्षी ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नुसार पगार वाढ देण्यात आली आहे. असे कमला भवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सांगितले आहे. ते कमला भवानी साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

 

पांडे (ता. करमाळा) येथील श्री. कमलाभवानी शुगर या साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर रोजी उसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून झाला. कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे हे होते.

 

यावेळी कुर्डुवाडी बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, लव्हेचे सरपंच विलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस सुनिल सावंत, शहाजी झिंजाडे, विनय ननवरे, विनोद पाटील, अशपाक जमादार, ज्ञानेश्वर क्षीरसागर, डॉ. शेंद्रे, काकासो पाटील, रमाकांत कुलकर्णी, शहाजी कदम, केशव दास, गणेश सरडे, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार व शेतकरी उपस्थित होते. 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे डायरेक्टर जनरल श्री. डांगे साहेब यांनी केले. तर आभार जनरल मॅनेजर श्री रोकडे साहेब यांनी केले. तसेच सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक समाधान भोगे व त्यांच्या पत्नी माधुरी भोगे यांच्या हस्ते करण्यात आली.

 

करमाळा तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर देत असून भविष्यात एक ते दोन वर्षात डिस्टलरी प्रकल्प सुरू करून जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्री. विक्रमसिंह शिंदे संस्थापक अध्यक्ष, कमलाभवानी शुगर लि. पांडे

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close