हवेली/लोणी काळभोर


भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी फेसबुक वर वारंवार अवमानकारक पोस्ट विधान करणाऱ्या वंदना भोसले या जातीवादी महिलेवर महापुरुषांचा अवमान केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तिला लवकरात लवकर अटक करून न्यायालयासमोर हजर करावं. अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेना, भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले.

वंदना भोसले या नावाची मुलगी फेसबुक वर सक्रिय असून फेसबुक वरील अकाउंट वरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच बौद्ध समाज व इतर अनेक परिवर्तनवादी महामानवांच्या संदर्भात जातीवाचक भडकाऊ आणि बदनामीकारक मजकूर टाकत असते. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगे भडकविण्याचा प्रयत्न सदर महिला करीत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल अत्यंत बदनामीकारक व दर्जाहीन लेखन करून समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न वंदना भोसले मुलगी करीत असते.
येत्या दोन दिवसात या महिलेस अटक नाही केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आरपीआय हवेली तालुका अध्यक्ष मारुती (दादा) कांबळे, आरपीआय प्रदेशाध्यक्ष राहुल डोंबाळे, पूर्व हवेली अध्यक्ष रमेश गायकवाड, भीम आर्मी च्या पुणे जिल्हा अध्यक्षा सौ. मीनाताई अडसुळे, मंदाताई गायकवाड, सुजाता ताई नाईकवडे, सतीश पवार, पॅंथर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष आकाश जाधव, प्रदीप थोरात, संदीप खरात, साकी (भाऊ) गायकवाड, आदी उपस्थित होते.




