
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


वेदांता चा प्रकल्प महाराष्ट्रा ऐवजी गुजरात च्या घशात घातल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य श्री. नितीनभाऊ झिंजाडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, आपण राज्याचे एक जबाबदार मुख्यमंत्री असताना राज्याच्या हिताप्रती असंवेदन असल्याचे दिसून येत आहे. हल्लीच आपण राज्याच्या विधानसभेत वेदांता चा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार असलेचे सांगितले होते. आणि अवघ्या महिन्याभराच्या आतच हा प्रकल्प राज्यातून गुजरातला त्यांनी हलवला आहे. यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या या नुकसानीची जबाबदारी स्विकारून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी झिंजाडे यांनी केली आहे.




