-->
करमाळाराजकिय

करमाळा भाजपाची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्न

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटारसायकल रॅलीमध्ये शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या तिरंगा रॅलीमध्ये करमाळा शहर व तालुक्यातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या बाईक रॅली ची सुरुवात किल्ला वेशीतील खोलेश्वर मंदिर येथून करण्यात आली. ही बाईक रॅली पुढे महात्मा गांधी हायस्कूल, गायकवाड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जय महाराष्ट्र चौक, फुल सौंदर चौक, स्वामी विवेकानंद चौक, महाराणा प्रताप पुतळा, मंगळवार पेठ, गुजर गल्ली, मेन रोड, सुभाष चौक, दत्तपेठ येथून छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close