पाथुर्डी येथील शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रथमच महिलेला संधी
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इतिहासात प्रथमच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी एका महिलेला संधी देण्यात आली आहे. गुरुवार दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्नंगठन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वांनुमते अकरा सदस्यांची निवड करण्यात आली.
यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदासाठी सौ. मीनाताई आप्पा मोटे यांची तर उपाध्यक्षपदी श्री. सदाशिव कांतीलाल तोडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.चांगदेव नागनाथ कानडे, उपाध्यक्ष श्री. सुरेश साधू मोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.धनंजय अंकुश मोटे, माजी उपसरपंच प्रकाश पोपट वैद्य, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य चांगदेव मोटे, नागनाथ दुरगुडे, बाबीर उत्तम वाघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व पत्रकार शितलकुमार मोटे, माजी सरपंच बाळासाहेब मोटे, चेअरमन संतोष मोटे, विलास खरात तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते.



