-->
करमाळाविशेष

दोन डोके असलेल्या बाळाचा जन्म; निर्दयी जन्मदात्यांचा रुग्णालयातून पळ, डॉक्टरांनी घेतला ‘हा’ निर्णय

 

माय मराठी न्युज नेटवर्क

झारखंडची राजधानी रांची येथील रिम्स रुग्णालयामध्ये नवजात मुलाला सोडून त्याचे पालक पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाला सोडून जाण्याचे कारण या नवजात बालकाला दोन डोकी होती. असे सांगितले जात आहे की, या नवजात बालकाला डोके सारखा आजार असल्यामुळे त्याला जन्म देणाऱ्या आईलाही त्याची दया आली नाही आणि ती त्याला सोडून निघून गेली. मुलाचा दोष एवढाच होता की, तो सामान्य मुलांसारखा नव्हता. कारण, जर त्या मुलाला बोलता येत असते तर त्याने मला दोन डोकी असतील तर यात माझा काय दोष..? असा प्रश्न नक्कीच आपल्या जन्मदात्या आईला विचारला असता.

RIMS च्या न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. सीबी सहाय यांनी सांगितले की, मेंदूचा योग्य विकास नाही झाला तर अशा समस्या उद्भवतात. मुलाला जन्मजात आजार असून या आजारात मेंदूचा डोक्याच्या मागचा भाग, CSF बाहेर येऊन थैलीसारखा बनतो. जे हुबेहुब डोक्यासारखे दिसते. वैद्यकीय भाषेत त्याला ओसीपीटल मेनिंगो एन्सेफॅलोसेल म्हणतात. डॉक्टरांच्या टीमने मिळून दोन तास शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मुलाला जवळून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

या मुलाच्या पालकांनी रुग्णालयामध्ये चुकीचा पत्ता टाकला होता. ते पळून गेल्यानंतर त्यांनी नोंदवलेल्या पत्यावर संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नोंदवलेला पत्ताही बनावट असल्याचे आढळून आले. कदाचित त्यांना आधीच कल्पना असावी की, आपले मूल सामान्य होणार नाही. किंवा त्यांनी आधीच ठरवलेले असावे की, मुलाला जन्म दिल्यानंतर पळून जायचे आहे. बाळाच्या जन्मानंतर बाळाला निओनेटल ICU मध्ये दाखल केल्यानंतर कुटुंबीय शांतपणे निघून गेले. पण, डॉक्टरांनी मुलाला वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

यानंतर, RIMS च्या व्यवस्थापनाने CWC ला मूल एकटे असल्याची माहिती दिली. CWC कडून माहिती मिळाल्यानंतर करुणा संस्थेचे लोक त्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले. तेथील डॉक्टर देवेश यांनी स्वतः पुढे येऊन मुलासाठी रक्तदान केले. त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

करुणा संस्थेतील लोकांच्या म्हणण्यानुसार, बाळाला निओनेटलमधून न्यूरो सर्जरी विभागात पाठवण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस थांबल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले होते. संस्थेच्या लोकांनी डिस्चार्ज दिल्यानंतर या मुलाला करुणा एनएमओ आश्रमात नेण्यात आले. त्यानंतर मूल १५ दिवसांचे झाल्यावर त्याला ऑपरेशनसाठी RIMS च्या न्यूरो सर्जरी विभागात आणण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर बाळाला पुन्हा करुणा आश्रमात नेण्यात येणार आहे. रांचीचे अनेक ज्येष्ठ डॉक्टर मिळून ही करुणा संस्था चालवतात.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close