-->
करमाळा

भाळवणी ते वाशिंबे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; ऊद्घाटनापूर्वी नटले भाळवणी स्थानक

 

वडशिवणे प्रतिनिधी/महेश कामटे

सोलापूर – पुणे या रेल्वे मार्गाच्या दूहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून वेगाने सुरू असुन यामध्ये करमाळा तालुक्यातील वाशिंबे ते पोफळज, जेऊर, भाळवणी असे एकूण २६.३३ किलोमीटर अंतर रेल्वे मार्गाचे दूहेरीकरण काम पूर्ण झाले आहे. मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे, मुंबई) यांनी वाशिंबे रेल्वे स्थानक ते ‌भाळवणी रेल्वे स्थानकापर्यंत या कामाची ‌पाहणी केली. या रेल्वे मार्गाच्या दुहेरी करणाचे काम पूर्ण झाले असून बुधवार दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी या मार्गाची रेल्वे चाचणी झाली आहे.

यावेळी आरोरा यांच्या उपस्थितीत वाशिंबे रेल्वे स्थानकाच्या नुतन ईमारतीचे ही उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी रेल प्रबंधक शैलेंद्र गुप्ता, वरीष्ठ मंडल परिचालन प्रबंधक एल. के. रणयेवले, संतोष जाधव, लखन बिरांजे आदी मान्यवर उपस्थित होते.

या दरम्यान याच मार्गावरील वाशिंबे ते भिगवण रेल्वे मार्गावरील अंतिम टप्यातील २९ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू असुन मार्च २०२२ पर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close