-->
करमाळाविशेषसामाजिक

मिरगव्हाणचे सुपुत्र सचिन भस्मे यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सेवा अभिलेख उत्तम ठेवणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी मिरगव्हाण (ता. करमाळा) येथील सचिन चंद्रकांत भस्मे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे.

सचिन भस्मे यांनी आतापर्यंत पोलिस दलात १८ वर्षे सेवा बजावली आहे. ही सर्व सेवा दौंड शहर व तालुक्यामध्ये झाली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील भस्मे यांचे प्राथमिक शिक्षण मिरगव्हाण येथे तर पुढील शिक्षण करमाळा, बार्शी आदी ठिकाणी झाले आहे.

२००५ साली ते कॉन्स्टेबल म्हणून पोलिस दलात भरती झाले. गावातील अनेक तरुणांना त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन विचार कायमच मिळत आहे. याचा अनेक युवकांना फायदा झाला आहे. भस्मे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेले बंदोबस्त, विविध ठिकाणी दिलेले प्रशिक्षण आधी कामगिरीसाठी आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना १०५ बक्षीस मिळाले असून त्यांच्या या कामगिरीचा आलेख पाहून या वर्षीचे पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. भस्मे यांच्या या यशाचे करमाळा तालुक्यातून तसेच मिरगव्हाण परिसरातून विशेष कौतुक होत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close