-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांना अटक करा अन्यथा…; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

गेल्या गळीत हंगामातील ऊस बिलाची थकित एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. या मागणीसाठी कारखाना स्थळावर गेलेले शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय तात्या रणदिवे यांना मारहाण करणारे व धमकी देणारे मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांना अटक करण्यात यावी. अशी मागणी करमाळा तालुका स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करमाळा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील हंगामातील थकीत रक्कम मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मकाई कारखान्यावर गेले असता कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी दोन दिवसात एफ.आर.पी. ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो. असे लेखी पत्र दिल्यानंतर कारखान्या वरून जात असताना चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय तात्या रणदिवे यांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या व तुला बघुन घेतो अशी धमकी देणाऱ्या दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, त्यांना अटक करेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. तरी कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांना अटक करावी व अटक न केल्यास महाराष्ट्र भर स्वाभिमानी संघटना व शेतकरी तीव्र आंदोलन करतील. तसेच यापुढे होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.

 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, ता. पक्षाध्यक्ष बापू फरतडे, ता. उपाध्यक्ष तानाजी शिंदे, जातेगाव शाखाअध्यक्ष अशोक लवंगारे, स्वाभिमनी नेते मारूती नीळ व अन्य शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close