-->
करमाळाकृषी विषयक

जिल्हा दूध संघाची मालमत्ता विकून संघ मोठा होणार नाही, इतर संस्थांनाही विश्वासात घेणे गरजेचे- सचिन देशमुख

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

जिल्हा दूध संघाची मालमत्ता विकून संघ मोठा होणार नाही. तर सोलापूर जिल्हा सहकारी दुध संघाने जिल्ह्यातील इतर प्रत्येक दुध संकलन करणार्‍या दुध संस्थाना विचारात घेऊनच निर्णय घ्यावेत. अशी मागणी करमाळा तालुक्यातील वांगी येथील लोकविकास सह. दूध संस्थेचे चेअरमन श्री. सचिन देशमुख यांनी केली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांना मी जिल्ह्यातील इतर दुध उत्पादक संस्थेच्या वतीने सांगु इच्छितो की, सद्यस्थितीत जिल्हा दुध संघाचे दुध संकलन फारच कमी आहे. त्याला कारण म्हणजे सध्याची परस्थिती पाहता संपुर्ण राज्यभर दुध व्यवसायात असलेली स्पर्धा हे आहे. सध्या दुध म्हटल की, प्रती लिटर 3.5/8.5. ला किती दर आहे.? इतर खाजगी डेअरीपेक्षा ज्यादा किती दर देणार.? अगोदर ॲडव्हान्स किती देणार.? असे एक ना अनेक प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारले जातात.

 

 

सध्या दूध संकलन करण्याच्या स्पर्धेमध्ये घरोघरी, वाड्या, वस्तीवरील दुध कमी प्रमाणात असले तरीही वाहतूक करून संकलन करावे लागते. डिझेल मुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेली १२ ते १३ वर्ष झाली यामध्ये माझा अनुभव आहे. त्यावेळी ४० रुपये प्रति लिटर प्रमाणे मिळणाऱ्या डीझेलनी आत्ता शंभरी गाठली आहे. तरीपण दुध वाहतूक व कमिशन तेवढेच आहे. त्यामुळे वाहतूकीच्या पट्टीत दुध संकलन वाढवायचे असेल तर ज्यादा पैसे टाकावे लागतात. हे सर्व नियोजन दूध संकलन करणाऱ्या संस्थाना करावे लागते.

 

 

जिल्हा दुध संघाला या स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर जिल्हा दुध संघानी सुद्धा जिल्ह्यातील इतर दुध संस्थाना विचारत घेऊनच प्रत्येक निर्णय घेणे हे संघाच्या फायद्याचे ठरणार आहे. संचालक मंडळात एकमत असणे गरजेचे आहे. सध्या फिरत्या दूध संकलनाची पध्दत आहे. त्यामधे पशुखाद्य ही उत्पादकाच्या घरी पोहोच करावे लागत आहे. दुध उत्पादकांना आर्थिक अडचन असेल, नविन गायगोटा बांधणे, नवीन गाय खरेदी करणे, जनावरांच्या आजारावरील खर्च, डाॅक्टरांची फी असे अनेक प्रश्न आहेत. उत्पादकाचे दुध किती आहे आणि दुधाच्या पटीत तो उचल किती मागतो हेही बघून उचल देणे अपेक्षीत असते. दुध उत्पादकांच्या अपेक्षा ही आत्ता दुधावरतीच येउन ठेपल्या आहेत. कारण दहा दिवसाला ताजे चलन म्हटले तर शेतीपुरक दुध व्यवसाय म्हणून फक्त दूध धंदाच उरला आहे.

 

 

दुध संकलन संस्था चालकास स्वताचा प्रपंच बाजुला ठेऊन सर्व दुध उत्पादकांच्या अडचनी वेळेत पुर्ण करने गरजेचे असते, तरच दुध संकलन चांगल्या प्रकारे टिकून राहते. तसेच दुध संकलन वाहतुकीच्या पटीत असेल आणि दुध संकलनाची गुणवत्ता चांगली असेल तरच या दुध संकलनाचा व खर्चाचा ताळेबंद लागतो. अन्यथा दूध संकलन कमी असेल तर संस्था चालवणे वाटते तेवढे सोपे राहिले नाही. संकलनासाठी सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस भरपूर वेळ द्यावा लागतो. त्याच पद्धतीने सोलापूर जिल्हा दूध संघानी पन छोट्या मोठ्या दुध संकलन करणार्‍या व डेअरी चालकांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. जिल्हा संघाला दुध संकलन वाढवायचे असेल तर जिल्ह्यातील इतर दुध संकलन संस्थाना बरोबर घेऊन निर्णय घेणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

 

 

खाजगी दुध संघापेक्षा एक दोन रुपये अधिक दर, कमीशन, वाहतूक, गावोगावी जागेवरून दुध उचलण्याची व्यवस्था तसेच संकलन संस्थांना चीलींग सेंटर देऊन दुध वाढवणे गरजेचे आहे. १००० लीटर संकलन असणाऱ्या संस्थांना १० ते १५ लाख बिगर व्याजी उचल देऊन संकलनामधे वाढ करने संघाच्या फायद्याचे होईल.

 

 

जिल्हा दूध संघाची मुंबई येथील जागा किंवा इतर मालमत्ता विकून संघ मोठा होणार नाही. इतर संस्थांना विचारात घेऊनच या सर्व गोष्टीवर विचार होणे गरजेचे आहे. संस्थाना कधीच विचारात नाही घेतले तर दुध संकलनामधे कशी वाढ होणार.? आपण सर्वच संचालक मंडळानी विचार करून दूध उत्पादकाचे हीत लक्षात घेऊन संघ चालवावा. संघाने दूधाचे सर्व उपपदार्थ बनवून आपल्याला जास्तीचा नफा कसा मिळवता येईल यावर भर द्यावा. सोलापूर जिल्हा दुध संघाने जास्तीत जास्त आपले संकलन वाढवावे जेणेकरून संघाचे नाव महाराष्ट्रभर होईल.

मा.श्री. सचिन देशमुख

चेअरमन, लोकविकास सह. दुध उत्पादक संस्था वांगी.१

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close