-->
करमाळाविशेष

केम येथील श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराचे काम भजणी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने पडले पार

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील तळेकर गल्लीतील श्री राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम श्री राम भजणी मंडळ व केम ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडले. हे राम मंदिर फार जुने असून १९३६ साली या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. तब्बल, ८५ वर्षा नंतर या मंदिराचे काम झाले आहे. या मंदिराची दूरावस्था झाली होती आणि मंदिराचा रंग ही गेलेले होता तसेच पावसाळ्यामध्ये मंदिर गळत होते.

या मंदिरामध्ये आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे येणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांची व पैठण येथील एकनाथ महाराजाची दिंडी मुक्कामाला असते. या मंदिरात मुक्कामाला येणाऱ्या वारकऱ्याची गैरसोय होत असायची. याचा विचार करून श्री राम भजणी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर दुरुस्तीचे काम हाती घेतले. या मध्ये मंदिराला रंग देणे, मंदिरात मार्बल फरशी बसविणे, मंदिरामध्ये नावे टाकणे तसेच मंदिराच्या छताचे ही काम केले. मंदिरावरील भगवा ध्वजासाठी स्टिल चे पाईप बसविले तसेच मंदिरात कासव बसविले आहे. अशी सर्व कामे झाली आहेत. त्या प्रित्यर्थ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.

 

या मंदिराच्या भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे मंहत जंयत गिरी महाराज यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत ह. भ. प. घाटणेकर महाराजांचे सुश्राव्य असे हरि कीर्तन झाले. त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या मंदिरासाठी केम ग्रामस्थ व श्रीराम भजणी मंडळ यांनी परिश्रम घेतले असून आता मंदिरामध्ये भाविकांना प्रसन्न वाटत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close