-->
करमाळामाहिती विषयक

शिवजयंतीनिमित्त जेऊर येथे प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान; पृथ्वीराज पाटील यांची माहिती

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंगळवार दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी शिवजयंती निमित्त शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ०७:०० वाजता होणार असल्याची माहिती युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 

 

 

याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने जेऊर येथे मंगळवार दिनांक ०८ मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मध्ये महाराष्ट्रातील नामांकित शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक श्री. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान मंगळवारी सायंकाळी ठिक ०७:०० वाजता सुरु होणार असून त्या अगोदर ठिक सायंकाळी ०५:०० ते ०७:०० या वेळेत शिवशाहीर सम्राट डाॅ. देवानंद माळी (सांगली) हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा सादर करणार आहेत.

 

 

हे दोन्ही कार्यक्रम येत्या मंगळवारी जेऊर येथील बाजारतळाचे भव्य पटांगणावर होणार आहेत. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यासह पाटील गटातील व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य तसेच जेऊर ग्रामपंचायत व मा.आ. नारायण पाटील मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमासाठी करमाळा तसेच माढा तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहुन शिव व्याख्यान व शिवचरित्र पोवाडा या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close