प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


संगोबा (ता. करमाळा) येथील श्री अदिनाथ महाराज मंदिर येथे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या यात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आली होती. आज पहाटेपासून पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर भरलेल्या या यात्रेत भाविकांमध्ये मोठ्याप्रमाणावर उत्साह दिसून आला. नित्यनियमाप्रमाणे आदिनाथ महाराजांची पुजा अर्चा, अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी संगोबा आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या निर्बंधामुळे यात्रे निमित्त आलेले स्टॉलधारक माघारी निघाले होते. परंतु त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून खांबेवाडी येथील काही युवकांनी खांबेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी ही उपस्थित होते.
सिना नदीच्या काठावर असलेल्या अदिनाथ मंदिरात दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी मध्यरात्री पासूनच अदिनाथ महाराजांच्या मंदिरात अभिषेक केले.



