-->
करमाळाराजकियविशेष

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली शिवसेना; दिवाळीनिमित्त शिधावाटप करून वाढविला आनंद!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यात उपक्रम; शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरी आनंदात साजरा व्हावा, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष शिधावाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच दिवाळीनिमित्त शिधावाटप करून शेतकरी कुटुंबांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि सोलापूरच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

शेतकरी हा समाजाचा कणा आहे. वर्षभर ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता शेतकरी कष्ट करत असतो. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे सण-उत्सव साजरे करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिधावाटप करण्यात आले, असे मत शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख (ओबीसी) सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे यांनी व्यक्त केले.

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. शिवसेना नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाहीही कर्चे यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close