
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये. तो सहकारी तत्त्वावर सुरु करावा. अशा मागणीचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करावा व नंतर या ठरावाला विशेष सर्वसाधारण सभा घेऊन तात्काळ मंजुरी देऊन या पारीत ठरावाच्या प्रती साखर आयुक्त व सहकार आयुक्तांकडे द्याव्यात. या मागणीचे निवेदन देण्यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे सदस्य बुधवारी ०२ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता रश्मी बागल यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देणार असल्याची माहिती बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर निवेदन देण्यासाठी आदिनाथ चे माजी व्हाईस चेअरमन प्राध्यापक शहाजीराव देशमुख, देवानंद बागल, धुळा भाऊ कोकरे, महेंद्र पाटील, डॉ. वसंत पुंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके, रविभाऊ गोडगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णा सुपनवर, भिमराव येडे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शिवशंकर जगदाळे, अजय बागल, उदयसिंह मोरे पाटील, अमरजीत साळुंके, नवनाथ शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, ॲड. देशपांडे, कामगार प्रतिनिधी डी. एम. शिंगटे, धनंजय विशाल तकिक, रामेश्वर तळेकर, किरण कवडे, संतोष पाटील, उपाध्यक्ष रमेश कांबळे, जहागीरदार, शिवाजी तळेकर, अशोक तकिक आदी बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी रश्मी बागल यांना भेटण्यास जाण्यापूर्वी बचाव समितीच्या सदस्यांनी दत्त मंदिर विकास नगर येथे एकत्र येऊन नंतर बागल यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तरी बुधवारी सकाळी ११:०० वाजता दत्त मंदिर, विकासनगर, करमाळा येथे आदिनाथ कारखाना च्या सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी उपस्थित रहावे असे आवाहान प्राध्यापक शिवाजीराव देशमुख यांनी केले आहे.



