
केम प्रतिनिधी /संजय जाधव


केम तालुका करमाळा येथील विठ्ठल मंदिरात वसंत पंचमी निमित्त पांडुरंगाचा विवाह सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी वैष्णव मेळा मोठया संख्येने उपस्थित होता. तसेच या सोहळ्या निमित्त विठ्ठल मंदिरात विद्युत रोषणाई केली होती. रंगीबेरंगी फुगे लावले होते. पांडुरंगाच्या व रुक्मिणीच्या मुर्तीची फुलांनी सजावट केली होती. पांडुरंगाला पोशाख परिधान केला होता. लग्नाच्या अगोदर वऱ्हाडी मंडळींना अक्षदा वाटप केला.
विठ्ठल रूक्मिणीचे लग्न पारंपारिक पद्धतीने आंतरपाट धरून मंंगलआष्टके गाऊन लावण्यात आले. ब्राह्मण विजय कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. तर मामा म्हणून अनिल तळेकर व रामचंद्र पारखे ऊभे राहिले. या लग्नात करवलीचा मान पलसे व सासवडे कुटुंबाना मिळाला. मंदिराचे पुजारी पिंकू गुरव व समाधान गुरव यांनी फुलाचा आरास करून इंद्र दरबार सारखी लग्नाची सजावट केली होती. लग्न लागल्यावर व्यापारी महेश वासकर यांनी वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले. या भोजनाचा आस्वाद हजारो भाविकांनी घेतला. हा सोहळा पंढरपूर सारखा करण्यात आला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपुर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती.
या सोहळ्यासाठी दत्तात्रय कुलकर्णी, विनोद कासार, दादा बोंगाळे, शिवाजी दौंड, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज गुरूजी, मारूती पळसकर, रामा पारखे, अमोल पळसे, तात्या कासार, अनिल तळेकर, गणेश पलसे, भैरू शिंदे, कांता पळसे, गणेश शेटे, विठ्ठल भजनी मंडळ, महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.




