कुकडीच्या पाण्याबाबत आ. नारायण पाटील यांची सतर्कता; पोंधवडी चारी क्षेत्रात जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नाने गेल्या तीन महिन्यांत कुकडीची दोन व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे एक अशी तीन पाणी आवर्तने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. यातच त्यांनी कुकडी बाबत आता बारकाईने लक्ष दिले असल्याने अधिकारी वर्ग कामाला लागला आहे, तर शेतकरी आपले प्रश्न प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन मांडत आहेत. सध्या करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे आवर्तन सुरू असून करमाळा तालुकाला पुरेशा दाबाने कुकडीचे पाणी मिळत नसल्याने शनिवार दि. १ मार्च रोजी आमदार नारायण पाटील यांनी कुकडीच्या पोधवडी चारीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अभियंता राजगोपाळ साळुंखे, कनिष्ठ अभियंता दीपक कईतके यांनी कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आमदार नारायण पाटील यांना माहिती दिली.
या प्रसंगी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याला साडेपाच ते पावणे सहा टीएमसी पाणी राखीव असून देखील करमाळा तालुक्याला पुरेशी पाणी मिळत नाही त्यामुळे योग्य नियोजन करून करमाळा तालुक्यातील कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्यक्षात पाहणी करत असताना विविध गावचे पदाधिकारी तसेच सामान्य शेतकरी वाटेत भेटून आमदार नारायण आबा पाटील यांना निवेदन देताना पहावयास मिळाले.
यावेळी पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे, जिच्यामामा हजारे, सोना गावडे, रूपचंद गावडे, शहाजी हुलगे, लालासाहेब हुलगे, आदिनाथ देवकते, संजय चोपडे, धनंजय कोडलिंगे, मोहन मारकड, प्रदीप हाके, जगन्नाथ नाळे, मंगेश बंडगर यांच्यासह पोंधवडी, विहाळ, कोर्टी, हुलगेवाडी, मोरवड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




