
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती भाजपा संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान अॅड. भगवानगिरी गोसावी यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुण – तरुणींनी आत्मसात करावेत व त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, भगवानगिरी गोसावी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, कोंढेज ग्रामपंचायतचे सदस्य बापू लोंढे, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस भैय्याराजे गोसावी, उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष लखन चिरके, किरण शिंदे, रमेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




