केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालय व शिवाजी प्राथमिक विदयामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योध्दाचा सन्मान मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जेष्ठ नेते दिलीपदादा तळेकर हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केमचे सुपूत्र सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व शिक्षणप्रेमी गणेश करे पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नागनाथ तळेकर यांनी केले. कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रात्र दिवस जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा सन्मान राजाभाऊ तळेकर विद्यालयाच्या वतीने ठेवण्यात आला होता. यासाठी सत्कारमूर्ती ना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार व डॉक्टर यांचा समावेश होता.
यामध्ये डॉ. संतोष पालखे, डॉ. विशाल जगदाळे, श्रीमती सुवर्णा बरगे, पूजा तळेकर, महेश तळेकर, शशिकांत ओहोळ, दिपक पाटिल, चंद्रकांत घोडके, गट प्रवर्तक श्रीमती स्वाती गोरे, आशा वर्कर श्रीमती शामल सरमरकर, सुशिला जाधव, संगिता पळसे, ज्योती जाधव, सुमन धोत्रे, सरस्वती गुळवे, अंजली भोसले, शारदा लांडगे, अंगणवाडी सेविका श्रीमती कल्पना धस पाटिल, मंगल कावळे, छाया ओहोळ, अनुसया लोंढे, सरस्वती कुरडे, मंगल पोकळे पार्वती तळेकर, सुरेखा खानट वैशाली बिचितकर, पद्मिनी टांगडे, अंजली लोंखडे, ताई मोहिते, सुनंदा हरणावळ, मनिषा करळे, सविता गवळी, आतकर मॅडम मदतनिस, ताई नागणे, राणी तळेकर, विमल तळेकर, सविता गावडे, आशा बोंगाळे, अनिता वायभासे, रूक्मिणी सोलापूरे, रंजना ओहोळ, शारदा लोहार, रंजना कांबळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षणप्रेमी गणेश भाऊ करे पाटिल, जेष्ट नेते दिलीप दादा तळेकर यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच आकाश भोसले, माजी सरपंच अजितदादा तळेकर, युवा नेते सागर दौड, सागर तळेकर, ऐ.पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटिल, संचालक महावीर तळेकर, भाजपाचे गणेश आबा तळेकर, डाॅ. अंकुश तळेकर, वसंत तळेकर, डाॅ. संदिप सुरवसे, डाॅ. योगेश कुरडे, डॉ. कमलेश जांभळे, माजी सभापती शेखर गाडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, शितल मोटे धनजंय सोलापुरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोज तळेकर, मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, उपाध्यक्ष महेश तळेकर, सहशिक्षक भारत गायकवाड, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रय पवार, बाळूराम सोनवणे, सुरेश पवार, सौ. शोभा लोंढे, श्रीमती माधुरी काळे, श्रीमती नाईक मॅडम, श्रीमती वर्षा तळेकर, श्रीमती शितल ढेरे, वैभव यादव, सुशांत दराडे, शाम तळेकर, रामा तळेकर, रामदास राऊत यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मॅडम यांनी केले तर आभार बाळासाहेब देशमुख यांनी मानले.
या कार्यक्रमाची संकल्पना राजाभाऊ तळेकर विद्यालय व शिवाजी प्राथमिक विदयामंदिर यांनी मांडल्यामुळे या शाळेचे कौतुक करून शाळेच्या कंपाऊंडसाठी शिक्षणप्रेमी गणेश करे पाटील यांनी वीस हजार रूपयेचा धनादेश मुख्याध्यापक श्री. मनोज तळेकर यांच्याकडे सुपूर्द केला.



