-->
करमाळाविशेषसामाजिक

स्मारक व्हावे अशी आंबेडकरी जनतेची मागणी तर, पेरणे ग्रामपंचायतीच्या कामाचे विषेश कौतुक

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

महाराष्ट्र शासन आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदाचे वर्षी पेरणे फाटा, ता. हवेली येथील विजयस्तंभावर शौर्यदिन साजरा करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले असून शासनाने या ठिकाणी चांगल्या प्रकारचे स्मारक लवकरात लवकर बांधावे अशी मागणी भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे.

 

यंदाच्या वर्षी शासनाने स्थानिक समित्यांना एकत्र आणत शौर्यदिन सर्व सुविधा देत साजरा केल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून विशेषतः महिला वर्ग आनंदी आहे. आंबेडकर अनुयायांना अभिवादन करण्यासाठी मोकळी जागा मिळाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्य वातावरण आहे. तरी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना या ठिकाणचे महत्व समजावे यासाठी स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी मागणी संपूर्ण भीम अनुयायांच्या वतीने करण्यात आली. यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने शौर्यदिनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले यामध्ये पेरणे ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीतील लोकांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगत पुढील वर्षी देखील प्रशासनाने यापूढे काम करावे अशी आशा यावेळी व्यक्त केली. यावेळी सुवर्णा डंबाळे, वंचित बहुजन आघाडी राज्य समनव्य स्वाती कदम, प्रशांत म्हस्के, अभिजित कांबळे, जयकिशन कांबळे, संदीप खरात आदी उपस्थित होते.

 

तर पेरणे ग्रामपंचायत च्या माध्यमातून येणाऱ्या अनुयायांचे गुलाबपुष्प व पाण्याची बाटली देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने शौर्यदिनाचे निमित्ताने कर्तव्य पार पडणाऱ्या तब्बल १००० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असल्याचे सरपंच रुपेश ठोंबरे यांनी सांगितले. यासाठी रवींद्र वाळके, ग्रामसेवक डी. एल. थोरात, साईनाथ वाळके, चांगदेव कोळपे, अतुल वाळके, बापूसाहेब कदम, अक्षय गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close