-->
करमाळा

पांडे येथे हनुमान जयंती निमित्त हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी /माय मराठी न्युज 

पांडे येथील युवकांनी एकत्र येऊन हनुमान जयंती निमित्त तिन दिवसीय हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते .

हनुमान जन्मोत्वाला सकाळी गावातील सर्व युवक व गावकरी उपस्थित होते.हनुमान जन्म झाल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी मध्ये लहान मुले व महिला यांचा सहभाग होता.

ह.भ.प.नारायण महाराज दौंडे (न्यायकैवल्य शिक्षण संस्था राजुरी)यांचे सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.शोभराज दुधे, अंगद वीर,नितीन दुधे,तात्यासाहेब लोंढे,सचिन दुधे,अमर वीर,अभिजित पाटील,परशुराम दुधे,सुरेश दुधे यांनी स्वखर्चाने महाप्रसाद वाटप केला.

या कार्यक्रमामध्ये व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प बळीराम महाराज राऊत यांनी काम पाहिले व ऋषिकेश महामुनी,सागर आंधळकर,आकाश आंधळकर, डॉ.शिवाजी वीर,शुभम वीर, डॉ.ओंकार वीर,अक्षय महामुनी,महेश राऊत,अनिल गोसावी, व गावातील युवकांनी पुढे होऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close