
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ बारामती संचलित इगल लीप इंग्लिश मीडियम प्रीस्कूल करमाळा व राणा नोबल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आला. करमाळा मध्ये अल्पावधीत शाळेने शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगला ठेवून या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली शैक्षणिक संस्था तयार करण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष श्री महेश दिवेकर व सौ स्वप्नाली दिवेकर यांनी केले आहे. तसेच करमाळा तालुक्यामध्ये असा कार्यक्रम करणारी ही पहिली शाळा ठरली आहे. असे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद फंड सर यांनी व्यक्त केले.
स्टेज डेकोरेशन आणि कार्यक्रमाचे नियोजन यासाठी श्री गणेश करे पाटलांनी कौतुकाची थाप दिली. करमाळा तालुक्यातील विद्यानगर करमाळा येथील इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बाल चमूंनी नृत्याविष्कार केला व या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, करमाळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुजित तात्या बागल, संजय ट्रेकिंग सेंटर पाचगणीचे नरेश लोहारा सर, सुरताल संगीत विद्यालयाचे नरारे सर, करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे विषय तज्ञ आदलिंग सर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर, चौधरी सर, प्राचार्या स्वप्नाली बागल मॅडम, उपाध्यक्ष विजय बागल, सचिव बाळासाहेब धुमाळ व पोपट धुमाळ, विभाग प्रमुख सचिन पाटील, उप प्राचार्या प्रीती शिंदे, पूजा मिस, कोमल मिस, गौरी मिस, सिद्धी मिस, आबासाहेब बागल, अभिषेक बागल सर्व पालक व प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी कृष्णा जाधव व त्यांची टीम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरिओग्राफी केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश लोहारा सर व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहिनी बागल यांनी केले.




