-->
करमाळाराजकियसामाजिक

नुतन जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना भक्कम पणे काम करेल- शंभूराजे फरतडे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठकारे) युवासेनेच्या जिल्हा विस्तारक पदी उत्तम सदाशिव आयवळे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखी युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेना राज्य सचिव वरुण सरदेसाई यांनी आज नियुक्ती केली आहे. त्याबद्दल करमाळा युवासेना संपर्क कार्यालयात तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस बोलताना शंभूराजे फरतडे यांनी म्हटले की, आयवळे हे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. हि आभिमानाची गोष्ट असुन त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेना भक्कम पणे काम करुन पक्ष बळकटी साठी प्रयत्न करु असे सांगीतले.

आयवळे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाढेगाव या गावचे सुपुत्र असून अनेक वर्षांपासून ते अंबरनाथ येथे वास्तव्यास आहेत. विद्यार्थी सेने पासुन ते शिवसेनेत सक्रिय असून अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक व आरोग्य समितीवर सभापती म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे. आदित्य ठाकरे व वरुण सरदेसाई यांचे ते अंत्यत विश्वासु व निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात.

या अगोदर ते माढा लोकसभा विस्तारक म्हणुन काम करत होते. या कालावधीत युवासेनेची त्यांनी मजबूत बांधणी केली, तसेच नुकत्याच झालेल्या सोलापूर सिनेट सदस्य निवडणुकीत त्यांनी मुंबई च्या धर्तीवर प्रचार यंत्रणा राबवून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अ‍ॅड. उषा पवार यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावर सिनेट सदस्य निवडून आणला.

आयवळे यांच्या या कार्याची दखल युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची विस्तारक म्हणुन जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे युवासैनिकांतुन स्वागत होत असून सर्व जिल्हा युवा अधिकारी, जिल्हा युवती अधिकारी, तालुका युवा अधिकारी, युवती तालुका, युवा अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

निवडीनंतर बोलताना नवनियुक्त जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे म्हणाले कि, युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण सरदेसाई यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असून संपूर्ण जिल्ह्य़ात युवासेना ताकदीने उभा करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हा युवा अधिकारी मयुर यादव, शहर युवा अधिकारी समिर परदेशी, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उप तालुका युवा अधिकारी समाधान यादव, सोशल मिडीया समन्वयक अजयराजे साखरे, शिवाजीराव माने आदि उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close