-->
करमाळाकृषी विषयक

तालुक्यात महाबीजचे शेकडो क्विंटल अनुदानित बियाणे पडून; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगामासाठी गहू व हरभरा बियाणे अनुदानित किंमतीत उपलब्ध करून दिले आहे. तरीसुद्धा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्यामुळे शेकडो क्विंटल बियाणे पडून आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेले महाबिजचे बियाणे सवलतीच्या दरात शेतकऱ्यांनी खरेदी करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय काकडे यांनी केले आहे.

 

याबाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम तसेच राष्ट्रीय सुरक्षा अभियान या अंतर्गत गहू व हरभरा बियाण्याची मोठी उपलब्धता करमाळा तालुक्यात करून दिली आहे. या अनुदानित बियाण्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. सध्या जरी शेतकऱ्यांतून या बियाण्याला मागणी नसली तरी थंडी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मागणी वाढेल.

 

दरवर्षी या बियाणाला शासनाकडून ५० टक्के अनुदान असते. यावर्षी अनुदानाची रक्कम कमी केली केली आहे. या दरात किंवा थोड्या फार फरकाने बाजारात दर्जेदार कंपनीचे गहू, हरभरा बियाणे उपलब्ध असल्यामुळे शेतकरी या अनुदानित बियाण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

शितलकुमार मोटे प्रगतशील शेतकरी, पाथर्डी

 

हरभरा जाकी १८० किंटल, हरभरा फुले विक्रम १०० क्विंटल, गहू ६२२२ = १२० क्विंटल, गहू लोकवन २१८९, हरभरा विजय शुद्ध बियाणे अनुदानावर उपलब्ध आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा.

 

 

आमच्याकडे गहू व हरभरा अनुदान उपलब्ध असलेले महाबीज कंपनीचे जवळपास ४०० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. मात्र, शेतकऱ्यांमधून मागणी नसल्यामुळे हे बियाणे पडून आहे.

  महेश चिवटे               महेश ऍग्रो एजन्सी, करमाळा

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close