-->
करमाळाक्रीडाराजकिय

गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा येथील जिन मैदानामध्ये भव्य निकाली कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोरोणा महामारीमुळे संपूर्ण जगामध्ये संचारबंदी असल्या कारणाने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. त्यामुळे महाराष्ट्रात कुस्ती मैदानेही बंद होती. या लॉकडाऊन नंतर प्रथमच करमाळा येथे भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आल्याने कुस्तीप्रेमींनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या मैदानाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभेचे खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे होते.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नेचर डिलाईटचे चेअरमन अर्जुन देसाई, करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उस्मानशेठ तांबोळी, विद्या विकास शिक्षण मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, पंचायत समिती सभापती अतुल पाटील, टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील सावंत, मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप, भारत वस्ताद जाधव, मनसे शहराध्यक्ष नानासो मोरे, करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक अतुल फंड, प्रशांत ढाळे, सचिन घोलप, प्रवीण जाधव, श्रेणिक खाटेर, अहमद कुरेशी, नवनाथ राखुंडे, राजेंद्र आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, विलास मुळे, पंचायत समिती सदस्य शेखर गाडे, दत्ता सरडे, गणेश चौधरी, गहिनीनाथ ननवरे, दत्तात्रय जाधव, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, अमोल यादव, ज्योतीराम लावंड, भरत अवताडे, संतोष जाधव, बाळासाहेब सूर्यवंशी, सरपंच आशिष गायकवाड, दादा जाधव, अभिजीत मुरूमकर, बळीराम शिंदे, बाळासाहेब मोटे, मच्छिंद्र हाके, भोजराज सुरवसे, धनंजय झिंजाडे, रमेश पाटील, दिनेश भांडवलकर, सुजित बागल यांच्या सह अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी पंच कमिटी म्हणून पै. अफसर (तात्या) जाधव, पै. चंद्रहास (बापु) निमगिरे, पै. अतुल पाटील, सुरेश शिंदे, दादासाहेब इंदलकर, महेश देवकते, बाळासाहेब पवार, शिवाजी नरुटे, सादिर शेख, विजय भोसले, सनी जाधव, आयुब शेख, धनंजय शिंदे, गणेश झाकणे यांनी काम पाहिले.

-:नेमलेल्या कुस्त्या:-

प्रथम क्रमांकाची कुस्ती

 

१) बाला रफीक शेख × सागर बिराजदार

२) अनिल जाधव × भरत लोकरे

३) सागर मोहोळकर × विक्रम शेटे

४) किरण माने × अनिल प्रमाणे

५) प्रशांत जगताप × गणेश जाधव

६) सतपाल सोनटक्के × रोहित पाटील

७) हर्षद जगदाळे × कृष्णा कांबळे

८) गणेश जाधव × प्रशांत जगताप

९) किरण जाधव × दातांक

१०) गौतम शिंदे × अंकुश खरात

यावेळी कुस्ती निवेदक म्हणून शंकर आण्णा पुजारीमदने सर यांनी काम पाहिले. हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, मोहन शिंदेकुस्ती कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close