केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील आठवडा बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम यांनी मा. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर साहेब यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, केम हे गाव कुंंकवासाठी प्रसिद्ध असलेले गावं आहे. या गावची लोकसंख्या सुमारे बारा हजाराच्या आसपास असून केम परिसरातील आठ ते दहा खेडयाचा बाजार हा केम येथील बाजारपेठेत च होतो. केम येथे दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. पण, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आठवडा बाजार बंद झाला आहे. आता कोरोना जवळपास संपुष्टात आला आहे. तसेच बऱ्याच गावचे आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे केम येथील ही आठवडा बाजार सुरू करावा.
केम येथील बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनची सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. बाजार असल्यास शेतकऱ्यांना आपल्या शेतातील फळे, पालेभाज्या, फळभाज्या विकून पैसै मिळतात. पण आता आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोलाने व्यापारी, दलाल यांना विकावा लागत आहे. हेच व्यापारी, दलाल भाजीपाला आवाच्या सव्वा भावाने विक्री करतात. परिणामी सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. भाजी ही दररोज लागणारी वस्तू आहे. ती महाग का असेना पण ती खरेदी करावी लागते. गेले दीड वर्षापासून दलाल, व्यापारी यांनी लुटले आहे. आता साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाला आहे. गावागावात ऊस तोड मजुर दाखल झाले आहेत. त्यांना किराणा माल, भाजीपाला व ईतर आवश्यक बाबी योग्यदराने विकत घेण्यासाठी त्यांना व्यापारी, दुकानदाराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यांचे दर न परवडनारे आहेत. त्यासाठी आठवडी बाजार सुरू करणे सध्या गरजेचे आहे.
केमचे सुपूत्र जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी ही आठवडा बाजार सुरू करण्यासाठी जातीने लक्ष घालावे अशी मागणी नागरीक व शेतकऱ्यांतून होत आहे.



