-->
करमाळासामाजिक

पूरग्रस्तांसाठी “आम्ही केमकर” कडून मदतीचा हात, 200 किट्सचा पुरवठा

 

केम प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपुर तालुक्यात अतिवृष्टी मुळे सावित्री नदीला आलेला महापूर आणि दरडी कोसळल्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. पूराचे पाणी जरी कमी झाले असले तरी संसार पाण्याखाली बुडून गेल्याने नागरिकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न कायम आहे. या नागरिकांना उभारी देण्यासाठी करमाळा तालुक्यातील केमचे सुपुत्र, पनवेल चे कर्तव्यदक्ष तहसीलदार विजयसिंह तळेकर साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील केम येथील अध्यक्ष सागरराज तळेकर, समीर तळेकर, सचिन जाधव, ओंकार भैय्या जाधव, महावीर आबा तळेकर, गणेश आबा तळेकर, वर्षाताई चव्हाण, अक्षय मालक गोडसे, पप्पूशेठ तळेकर, राजाभाऊ तळेकर, बालाजी आवताडे, बबलू सुरवसे, शिवाजी भैय्या पाटील, राकेश दोंड, दिपक भिताडे, अभय तळेकर, उमेश पाडूळे, विष्णू पंत तळेकर या तरुणांनी केम येथून #एक_हात_मदतीचा, #आम्ही_केमकर आणि #पूरग्रस्तांसाठी_मदत या हॅशटॅग च्या माध्यमातून ग्रामस्थांकडून खालील मदत गोळा केली.

  • किराणा किट 200
    फिनेल बॉटल्स 250
    साड्या 400
    ब्लॅकेट 200
    मेणबत्ती 3000
    गुड नाईट फास्टकार्ड 300
    महिला पॅड 100
    तांदूळ 100 बॅग (5 kg)
    मास्क 200
    बिस्कीट पुडे 1000
    लहान मोठ्या मुलांचे ड्रेस 250
    सॅनिटायझर 250
    कुरकुरे 100

ही मदत केम येथील शिवशंभूभक्त, आम्ही केमकर या नावाने पोलादपुर तालुक्यातील सावित्री नदीकाठच्या सरई गावात,महाड शहरामध्ये वाटप करण्यात आली.

यावेळी महाड पोलिस निरीक्षक गिरी साहेबांनी केम गावातील दानशुरांचे, मदतीसाठी एकत्र आलेल्या “आम्ही केमकर” या तरूणांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार काढले.

यामध्ये केम गावातील दानशूरांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार विजयसिंह तळेकर साहेब,किंगमेकर अजित दादा तळेकर, महावीर आबा तळेकर,नागन्नाथ तळेकर गुरूजी, सागर राजे दोंड, आनंद शिंदे, संतोष बिचितकर, अच्युत काका पाटील, संदिप तळेकर, कुलदीप व्हटकर साहेब, जालिंदर जाधव साहेब, कालिदास अप्पा तळेकर, संतोष शिंदे, जितेंद्र वासकर, किरण नकाते,तानाजी नाना दोंड,राजाभाऊ तळेकर विद्यालय, श्री उत्तरेश्वर हायस्कूल, नुतन माध्यमिक विद्यालय यांच्या सह अनेक दानशूरांनी सढळ हाताने मदत केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close