
केम प्रतिनिधी/संजय जाधव


सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा निमीत्त सामुदायिक राष्ट्रगीत गीत कार्यक्रम केम ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केला होता. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ०१ जानेवारी रोजी बाजार तळाच्या भव्य पटांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते दिलीपदादा तळेकर होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळ होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यांनी केले. यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत म्हटले.
यावेळी करमाळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, ऊपसरपंच नागनाथ तळेकर, वाघमोडे सर यांनी माझी वसुधंरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच अजित दादा तळेकर, सरपंच आकाश भोसले, माजी सभापती शेखर गाडे, गणेश आबा तळेकर, अनंता तळेकर, सोमनाथ यादव, युवा नेते सागर दौड, डाॅ. संतोष पालखे, दादा साहेब गोडसे, डाॅ. अंकुश तळेकर, संदिप तळेकर, सचिन शिनगारे दयानंद तळेकर, डाॅ. जांभळे, पत्रकार हर्षवर्धन गाडे, ऊज्वला तळेकर, तलाठी प्रमोद चव्हाण, आनंद शिंदे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल, नूतन माध्यमिक विद्यालय, राजाभाऊ तळेकर विद्यालय, शा. गो. पवार विद्यालय आदी विद्यालयातील ई. ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच जिल्हा परिषेद शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे केम ग्रामपंचायत चे कर्तव्य दक्ष ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यांनी सर्व विभागाला निमंत्रण पत्र काढले होते. ते गावातील सर्व ग्रुपवर ही पाठवले होते. तसेच सर्वाना फोन वरून व संदेशव्दारे याची कल्पना देऊनही केम पोलिस चौकीतील एकही पोलीस अधिकारी तथा कर्मचारी या कार्यक्रमाला हजर नव्हता. त्यामुळे ऊपस्थित नागरिकातून चर्चा होत होती.




