-->
करमाळामाहिती विषयकराजकिय

हॅम अंतर्गत तालुक्यातील रस्ते विकासासाठी २७० कोटी ८१ लाख निधी मंजूर- आ. संजयमामा शिंदे

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर) 

 

करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ७१.५ किलोमीटर लांबीच्या २ रस्त्यांसाठी हायब्रीड अन्युटी (हॅम) अंतर्गत तब्बल २७० कोटी ८१ लक्ष ८८ हजार ८६८ रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये हॅम अंतर्गत ७१.५ किलोमीटर लांबीचे २ रस्ते विकसित करण्यासाठी आपण सुचविले होते. त्यातील केतुर नं.२ – केतुर नं.१ – वाशिंबे, सोगाव – राजुरी – सावडी ते जिल्हा हद्द हा ८.५० किमी चा रस्ता तसेच सावडी, राजुरी, पोंधवडी, विहाळ, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज, निंभोरे, मलवडी, केम, उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव ते वेणेगाव हा ६३ कि.मी लांबीचा रस्ता अशा एकूण २ रस्त्यासाठी २७० कोटी ८१ लक्ष निधी मंजूर झाला असून याचा फायदा करमाळा तालुक्यातील ११ व माढा तालुक्यातील ४ अशा एकूण १५ गावांसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

 

या रस्त्यासाठी प्रति किमी जवळपास ४ कोटी निधी मंजूर झाला असून संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण केले जाणार आहे. सदर रस्त्याची निविदा काल दि. ११ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून Tender ID – 2024_MSIDC_1031543_24 हा आहे. एप्रिल अखेर पर्यंत सदर कामाची निविदा खुली केली जाईल. सदर कामामुळे करमाळा तालुक्यातील दुर्लक्षित असलेली गावे एकमेकांना जोडली जातील. त्याचबरोबर ती राष्ट्रीय महामार्गालाही जोडली जाणार आहेत. अ.नगर जिल्हा ते सोलापूर जिल्हा असा हा दोन जिल्ह्यातील गावांना जोडणारा अतिशय जवळचा मार्ग यामुळे तयार होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close