-->
करमाळाक्राईमराजकियराज्य

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा शिवसेनेकडून निषेध; मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

ठाकरे गट शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालून केलेल्या हत्येचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा युवासेना व शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी बोलताना फरतडे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना पाय उतार करून सत्तेत आलेल्या मिंधे फसवणीस सरकारने गुंडाना पोसण्याचे काम सुरू केले आहे. आमदारांकडून गणेश मिरवणूकीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये भर दिवसा गोळीबार केला जात आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना पदं वाटली जात आहेत. “आम्ही कायदा हातात घेतला तरी सागर बंगल्यावर आमचा बाॅस बसला असून पोलीस आमचे वाकडे करू शकत नाहीत” असे पोलीसांसमोर सांगण्याची हिम्मत आमदार करत आहेत, त्यामुळेच गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे. गोळ्या घालून हत्या करण्याचे काम सुरू आहे. अनेक सराईत गुन्ह्यात असलेले गुन्हेगार मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढून मंत्रालयात रिल्स काढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून बिहार, युपीला लाजवेल असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली. 

 

या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख संजय शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुकाप्रमुख शंभू फरतडे, शहरप्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर पांढरमिसे, सोमनाथ पोळ, मयुर तावरे यांच्या सह्या आहेत. या प्रसंगी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्विकारले.

 

संभाजी ब्रिगेडने पाठिंबा देऊन केला निषेध 

करमाळा तालुका संभाजी ब्रिगेड यांनी शिवसेनेच्या मागणीस पाठिंबा देऊन घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला. या वेळेस संभाजी ब्रिगेडचे करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा सचिव गणेश सव्वासे, तालुका संघटक मयुर सावंत, शहर अध्यक्ष वैभव माने, कार्याध्यक्ष राजेश ननवरे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close