-->
करमाळामहिलाविषयकविशेष

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्याला अटक करा; ‘यांची’ उप-वि.पो. अधिकार्याकडे निवेदनाव्दारे मागणी

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्यातील साडे, सालसे, वरकुटे, घोटी या भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व महिलांना दाम दुप्पट रक्कम करून देतो असे म्हणून फसवणूक करणाऱ्या साडे येथील रहिवाशी कोंडीबा चव्हाण याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सर्वसामान्यांचे पैसे परत मिळून द्या. अन्यथा २४ डिसेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा गोरगरीब महिलांनी दिला आहे. आज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी व महिलांनी लेखी निवेदन दिले.

 

 

या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, कोंडीबा आबा चव्हाण हा व्यक्ती बँक ऑफ इंडिया, शाखा साडे येथे लेखापाल म्हणून काम करत होता. या बँकेत येणाऱ्या सर्वसामान्य, कष्टकरी, मजूर, शेतकरी यांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन देऊन त्याने कोट्यावधी रुपयाची रक्कम गोळा केली. ही रक्कम गोळा केल्यानंतर विविध कंपन्यांच्या नावे वेळोवेळी पैशाची पोचपावती दिली. मात्र, आता मुदत ठेवीच्या तारखा संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. कंपनी बुडाली मी काय करू आणि माझ्या विरोधात तक्रार केली तर तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करून तुम्हालाही उध्वस्त करू अशी धमकी देत आहे. कोंडीबा चव्हाण याने या पैशाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली असून तो आता समाजात उजळ माथ्याने फिरत आहे. गुंतवणूक करणारे सर्व सामान्य कष्टकरी शेतकरी आहेत. आम्ही या प्रकरणात अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या पण कोणीही दखल घेतली नाही. यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना निवेदन देण्यात आले.

 

 

यावेळी फसवणूक झालेले कल्याण आनंदा मोगल, शारदा चंद्रकांत जगताप, श्रीमंत औदुंबर जगताप, ज्ञानेश्वर पांडुरंग जगताप, पांडुरंग रामचंद्र जगताप, अश्विनी ज्ञानेश्वर जगताप, मीनाताई जयश्री कल्याण, गंगाधर मोगल, मंगल मोगल, रतन मोगल, लखाबाई कल्याण, अश्विनी जगताप, पद्मिनी शिरसाट, उज्वला गावडे, शारदा जगताप व आदींनी हे निवेदन दिले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून या सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना प्रयत्न करेल असे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close