-->
करमाळाविशेषसामाजिक

पाडळी-घारगाव-बोरगांव रस्त्याची दुरवस्था; घारगाव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली दुरुस्तीची मागणी

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीने बोरगाव ते घारगाव व घारगाव ते पाडळी हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत चे निवेदन उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांच्याकडे दिले आहे.

बोरगाव ते घारगाव या रस्त्याचे अंतर ०६ कि.मी. असून सदरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करण्यासाठी, दळणवळणासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. खराब रस्त्यामुळे ऊस वाहतूककीस ही खूप अडचणी येत आहेत. मराठवाड्यातील परांडा, लातूर, उस्मानाबाद व भूम यांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून मराठवाड्यात बऱ्यापैकी वाहनांची ये-जा होत असते. यासाठी घारगांव ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव संमत करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन श्री. के.आर. सापते साहेबांनी स्वीकारले.

 

यावेळी घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश बापू पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय सरवदे, संतोष होगले, दत्तात्रय मस्तूद, रामलींग आण्णा देशमुखे, दादा पाटील, मा. ग्रा. सदस्य लक्ष्मण पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close