-->
करमाळाराजकिय

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा सोलापूर जिल्ह्यातील २६ बोगस शाळा व १६ कॉलेज वर कारवाईचा आदेश

 

केम प्रतिनिधी / संजय जाधव

दिनांक ११/०८/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रामचंद्र वाडकर सर यांच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातील अनेक बोगस शाळा व कॉलेज च्या बाबतीत परीक्षा मंडळ पुणे येथे सुनावणी घेतली. या शाळा आणि कॉलेज च्या विरोधात खांडके समितीचा चौकशी अहवाल आल्यानंतर ही कारवाई का केली नाही असा प्रश्न डायरेक्टर जगताप साहेब यांना विचारत लवकरात लवकर सुनावणी घेऊन संबंधित २६ बोगस शाळा व १६ बोगस कॉलेजवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या सुनावणीच्या दरम्यान सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार, जिल्हा समन्वय पंडित साळुंखे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, माढा तालुका अध्यक्ष केसर वाचले आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कारवाई मुळे संस्था चालकाचे धाबे दणाणले आहेत. या बोगस शाळांवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे अशीही चर्चा जिल्हात सुरु आहे. या मुळे प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

प्रहार संघटनेने जिल्ह्यातील कोणत्याही अडचणी सोडवण्याच्या कामाचा धमाका सुरू केला आहे. मग ते कोणतेही काम असो, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न असो किंवा साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसबील अडकवलेले असो. जिल्ह्याध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अजित कुलकर्णी, संदिप तळेकर, खालिद मनियार, साळूंके हे रात्र दिवस जनतेसाठी कामे करीत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close