माय मराठी न्युज प्रतिनिधी:


महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष कामदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रहार संघटनेचे राज्यमंत्री आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोळगाव येथील नूतन ग्रा. सदस्य मंत्रालयातील स्वीय सहाय्यक श्री. अमित (दादा) जाकते यांचे पुढाकारातून व प्रहार रुग्णसेवक, तालुका अध्यक्ष श्री. विकी मोरे व सहकारी यांनी मिळून कोळगाव मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या वेळी कोरोना विषयी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करत, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले. कोळगाव चे सुपुत्र श्री. अमित (दादा) जाकते व त्यांचे सहकारी हे गावात नेहमी विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. स्वच्छता अभियान, तंटामुक्ती, वृक्षारोपण, उन्हाळ्यात पक्षांना जीवनदान म्हणून पाणपोई असे विविध उपक्रम राबवित असतात. तसेच गाव रोगमुक्त ठेवण्याचा ही प्रयत्न करत असतात. दुसऱ्या लाटेतील कोरोना संकटात हि कोळगाव हे जवळपास कोरोना मुक्त ठेवण्यात अमित जाकते व त्यांच्या सहकर्यांना यश आले. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातूंन विशेष कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे आज रक्तदान शिबिराला पण गावातील तरुणवर्ग व महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी कुर्डवाडी ब्लड सेन्टर या रक्तपेढीचे रक्तसंकलानाचे काम केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील, उमेश चेंडगे, रमेश चेंडगे, करण चेंडगे, अक्षय सुतार, शरद पवार, अप्पा जाकते, मयूर शिंदे, गणेश पाटील, सुमित जाकते, प्रणित जाकते, या सर्वांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यास आपला विशेष सहभाग नोंदवला.




