-->
करमाळासामाजिक

चिखलठाण येथील सुराणा प्रशालेला ‘या’ माजी विद्यार्थ्याकडून व्यायाम शाळा साहित्य भेट

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील मौजे चिखलठाण येथील श्रीम. रा. बा. सुराणा विद्यालयामध्ये शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार बारकुंड यांच्या प्रेरणेने कैलास कानगुडे (रा. केडगाव, ता. करमाळा) यांचे चिरंजीव श्री. दिनेश कानगुडे (सध्या रा. मुंबई) या माजी विद्यार्थ्याने विद्यालयास कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून डबल बार व सिंगल बार हे व्यायामाचे साहित्य करमाळा तालुक्याचे आमदार मा. श्री. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करमाळा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तथा मा. जि.प. उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार बारकुंड, विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने व विद्यालयातील जेष्ठ शिक्षक धनंजय भोसले, शिवाजी मासाळ, लक्ष्मण गोडगे, साईनाथ लोहार, अतुल जानभरे, हनुमंत लगस आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close