-->
करमाळाविशेष

गाईला आई मानणाऱ्या सईचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल; दोन वर्षाची चिमुकली चक्क गाईंच्या स्तनाला पिते दूध

केम प्रतिनिधी/संजय जाधव

आपल्या देशातील खिलारी वाणांची (गावरान) गाय ही वळू व बैलासाठी प्रसिद्ध आहे. या गाई कमी दूध देत असल्यामुळे आजच्या काळात त्यांचे संगोपन करण्यास परवडत नाही म्हणून दुग्धव्यवसायिक या गाईंना सांभाळत नाहीत. पंरूतु, करमाळा तालुक्यातील केम येथील गोरक्षक परमेश्वर तळेकर यांनी आरोग्याची सांगड घालून या गाईंचे संगोपन करत आहेत व यावरच ते आपले कुटुंब चालवत आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गोरक्षक परमेश्वर तळेकर यांनी गाईचे शेणापासून गोवऱ्या तयार करून त्याचा भस्म तयार केला आहे आणि त्यापासून दंतमंजन तयार केले आहे. तसेच गोमूत्रा पासून आयुवेर्दिक औषधं तयार केली आहेत. तसेच साबन, अगरबत्ती व वेदनाशामक औषधे ही बनविली आहेत. ही औषधे, दत्तमंजन परमेश्वर तळेकर हे गावो-गावी जाऊन विक्री करतात. त्यांच्या दंतमंजनाला चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे या दंतमंजन च्या वापराने दातांचे दुखणे थांबते व दातांची दुर्गंधी येत नाही. त्यांचेकडे एकूण ३१ गाई आहेत. परमेश्वर तळेकर व त्यांचे कुटुंब या गाईंची सेवा करीत आहेत. आपण व्यवहारात आई आणि गाई एकच आहे असे मानतो त्याचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळतो.

परमेश्वर तळेकर यांच्या कुटुंबातील एक दोन वर्षांची चिमुकली चक्क त्यांच्या कपिला गाईच्या स्तनाला तोंड लावून दूध पिते. या चिमुकलीचे नाव सई आहे. सईला आठ महिन्यांपासून च या गाईचे दुध पाजत असे. पण, आता ती स्वतःहून कपिला गाईच्या स्तनाला जाणुन दूध पिते. त्या गाईला तिचा लळा लागला आहे. ती दूध पिण्यासाठी आली की, गाई पान्हा सोडते व तिला भरपूर दूध पाजते. ही एक निसर्गाची देणगी आहे. ज्यावेळेस सईला भूक लागते त्यावेळेस ती गोठ्यात जाऊन गाईला दूध पीते.

परमेश्वर तळेकर यांना फक्त साडे तीन एकर जमीन असून या जमीनीत गाईसाठी वैरण व खाण्यापुरते उत्पादन काढले जाते. त्यांचे कुटुंब दहा माणसाचे आहे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा गाई व जमिनीवर अवलंबुन आहे. यातुन त्यांनी “गाय वाचवा, देश वाचवा” हा संदेश जनतेला दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close