करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


गेली दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीने हैराण झाले आहे. पहिल्या कोरोना लाटेचा अनुभव प्रशासनाला असताना ही दुसऱ्या लाटेत आपल्या देशात सर्वात जास्त जीवित हानी झाली. त्यातच आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य संघटनेकडून वर्तवली जात आहे. राज्य सरकारने अनलॉकच्या दृष्टीने काही निर्बंध शिथिल केले आहेत मात्र ,सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जेथे गर्दीमुळे कोरोना प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे तिथे शासकीय नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून सततच्या कडक लॉकडाऊन मुळे उद्योग, व्यवसाय व रोजगार हा ठप्प झाला होता. परंतु त्याला कारणीभूत ही जनताच होती. कारण कोरोना नियमांचे पालन न करता पहिल्या लाटेनंतर लोकांना दिलेल्या मोकळीकीमुळे च दुसरी भयानक लाट मोठी जीवित हानी करून गेली. आता पण प्रशासनाने मोकळीक दिली असताना लोकांनी स्वतःहून नियमांचं पालन करायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी, मोठी दुकाने, होलसेल किराणा, हॉटेल, कपड्याची दुकाने, सार्वजनिक वाहतूक, मंगल कार्यलय, अशा ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होत नाही म्हणून अशा ठिकाणी दैनंदिन निर्जंतुकीरण करणे गरजेचे आहे. अनेक लोक एसटी बस ने प्रवास करत आहेत परंतु बऱ्याच डेपोत बसचे निर्जंतकीकरण केले जात नाही. काही बस मध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजेच उभे राहून प्रवाशी प्रवास करतात. यावर चालक, वाहकानी नियंत्रण ठेवायला हवं. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा पण जीव धोक्यात घालू नये, कित्येक प्रवाशासह वाहक पण विना मास्क असतात. काही महाशय तर सांगतात आम्ही लस घेतली आता काय गरज मास्क घालायची पण लस घेतली तरी कोरोना होऊ शकतो हे विसरून चालणार नाही. याचा अर्थ आपण अजून संभाव्य तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे.
बाजारपेठेतील मोठी दुकाने, कपड्याची दुकाने, हॉटेल, मंगल कार्यलय, लग्नसोहळे, राजकीय कार्यक्रम, अशा ठिकाणी कुठेही निर्जंतकीकरण ची व्यवस्था नाही. लोक बिनधास्त विना मास्क फिरताना दिसत आहेत. लोकांनी नियमांचं पालन करायला हवं. स्वतः होऊन आपण बिनधास्त वागून पुन्हा लॉकडाऊन तसेच कोरोनाला आमंत्रण देत आहोत. आपणच पुन्हा मृत्यूच तांडव सुरु होण्यास कारणीभूत ठरतो आहोत. जर लोकांनीच स्वतः होऊन ठरवलं की आम्ही नियम पाळनारच तर नक्कीच आपण संभाव्य तिसरी लाट रोखण्यात यशस्वी होऊ.
सध्या ग्रामीण भागात पुन्हा रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे शाळा व्यस्थापणाने हि कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करुनच वर्ग सुरु करण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. कारण पहिली ते पाचवी पर्यँत विद्यार्थी एवढे सुज्ञ नसतात. नजर चुकीने एखादा विद्यार्थी बाधित असेल तर सर्वाना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. देशासह राज्याच आणि आपणा सर्वांच लॉकडाऊन मुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे. म्हणून मी आपणास या माध्यमातून विंनंती करतो की, आपण कोरोना नियमांचं काटेकोर पालन केले, तर कोरोणाची तिसरी लाटच काय अशा कितीपण लाटा रोखण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. लॉकडाऊन पासून ही आपली सुटका होऊ शकते.



