
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेलगाव चौक ते वांगी २ या रस्त्याची गेल्या ११ वर्षांपासून अत्यंत बिकट दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील तरुणांनी टेंभुर्णी ते करमाळा रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा यांनी १३ लाख रूपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध केल्याचे पत्र आंदोलन कर्त्यांना दिले होते. मात्र मंजूर निधी मधील काम अद्याप सुरू न झाल्यामुळे आणि पूर्ण रस्त्याच्या नूतनीकरणाच्या मागणीमुळे आज रस्ते संघर्ष समितीने रक्तदान आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. जर रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी नाही लावला तर आंदोलन अती तीव्र करण्याचा इशारा समितीने यावेळी दिला आहे.
यावेळी असिफ पटेल, प्रविण जाधव, बाबु कोथमिरे, आण्णा सातव, प्रविण तकीक, रोहिदास माने, सचिन महाडिक, नितीन महाडिक, अतुल चौधरी, अमोल चौधरी, रामभाऊ चौधरी, गोपाळ चौधरी, अशोक तकीक, नाना तकीक, गणेश चव्हाण, सचिन तकीक, विजय तकीक, नितीन तकीक, सतिश तकीक, सोनाली तकीक, शितल पवार आदी आंदोलनकर्ते उपस्थीत होते.




