केम येथील शिक्षक प्रा.डॉ. मच्छिंद्र नांगरे यांची ‘या’ पुरस्कारासाठी निवड
केम प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील केम येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री. उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नांगरे यांची ज्ञान प्रबोधनी आंबेजोगाई संस्थेकडून देण्यात येणाऱ्या प्रयोगशील शिक्षक या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी एकूण ५० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामधून दहा शिक्षकांना नामांकन मिळाले होते तर अंतिम फेरीत नांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
या पुरस्कार निवड समितीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने निकष लावले होते. डॉक्टर नांगरे यांनी उत्तरेश्वर संस्कृती केंद्र स्थापन केलेले असून त्यामध्ये दर शनिवारी संबंधित असलेले संस्कृती उपक्रम, निबंध, भाषण, लेखन असे समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे साहित्यसंमेलन, स्वच्छता अभियान, आरोग्य आपल्या दारी, वाचन कट्टा हे सर्व उपक्रम या निवड समितीला खूप आवडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विश्वासाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवून दिलेले यश व परिपक्वता यामुळे त्यांची सदर पुरस्कारासाठी निवड झाली.
या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्यकुशल सचिव प्राचार्य सौ शुभांगी ताई गावडे, प्रशासन सहसचिव डॉक्टर युवराज भोसले, अर्थ सचिव डॉक्टर राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभाग प्रमुख सेवक डॉक्टर जयसिंगराव देशमुख, प्राचार्य कदम सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश कांबळे, गटशिक्षणाधिकारी भोंग साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व माजी सरपंच अजित दादा तळेकर, सागर दौंड, बाळू ननवरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यालयाचे केम परिसरातून कौतूक केले जात आहे.



