करमाळा प्रतिनिधी/


वटपौर्णिमेचे औचित्य साधून भाजपा करमाळा तालुका यांच्या वतीने शहरातील महिलांना वडाची रोपे वाटप करण्यात आली, पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी व्हावी तसेच महिलांना पूजनासाठी वटवृक्ष उपलब्ध व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले, वाटप केलेल्या रोपांचे महिलांनी जतन करावे यासाठी सावित्री वटवृक्ष स्पर्धा जाहीर करण्यात आली ,पुढील वर्षी या रोपाचे परीक्षण करून स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले ,
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, श्रीराम प्रतिष्ठानचे भीष्माचार्य चांदणे ,गजराज चिवटे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे ,उपाध्यक्ष भैया गोसावी ,प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, प्रसाद कोकीळ ,विश्वजीत चिवटे, गणेश गोसावी, महादेव गोसावी उपस्थित होते



