-->
राजकियराज्यविशेष

आमदार संजयमामा शिंदे यांच्या विरोधात अतुलभाऊ खुपसे तीव्र आंदोलन छेडणार, काय आहे प्रकरण;वाचा सविस्तर

 

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगांव, ता.माढा या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २०१३ साली खत देतो म्हणून कागदपत्रे जमा केली. संबंधित शेतकऱ्यांना खत न देता दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज स्वरुपात रक्कम रु. २२ कोटी ११ लाख उचलल्याचे समोर आले आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी तसेच पंजाब नॅशनल बँकेचे त्यावेळेचे शाखाधिकारी व आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांना खत देतो म्हणून १५०० शेतकऱ्यांचे नावावर तब्बल २२ कोटी उचलले आहेत. तसेच यशवंत राहकारी साखर कारखाना, थेऊर जि. पुणे यांच्या मालकीची १०० एकर जमिन खरेदी केली असून याच रक्कमेतून दोन ठिकाणी फार्महाऊसची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांना न कळविता कर्ज काढून आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर २ ते ३ लाखाचे कर्ज आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहे.

 

आमदार संजय शिंदे यांच्या पुतण्यानीही अशीच केली शेतकऱ्यांची फसवणूक

 

असेच कर्ज आ. संजयमामा शिंदे यांचे पुतणे माढयाचे आ. बबनराव शिंदे यांचे चिरंजीव श्री. रणजित शिंदे यांनीही काढलेले होते. त्या संदर्भात बार्शी कोर्टात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच त्यांचे दुसरे पुतणे श्री. विक्रमसिंह शिंदे यांच्या कमलाई साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढलेले होते. सदर कर्ज त्यांनी शासनाच्या कर्जमाफीत बसवून माफ करून घेतले आहे. करमाळयाचे आ. संजय शिंदे आणि माढयाचे आ. बबनदादा शिंदे यांचा व त्यांच्या वारसांचा कारखान्याच्या माध्यमातून असा उद्योग आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर २ ते ३ लाख कर्ज उचलावयाचे आणि कर्जमाफी झाल्यावर ते कर्ज माफित बसवून बँके अधिकारी मॅनेज करुन कर्जमाफीचा लाभ उचलायचा. कर्जमाफीचे खरे लाभार्थी हेच असून जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तेव्हा तेव्हा करमाळा, माढा तालुक्यातील आणि सोलापुर जिल्हयातील जनतेवर अन्याय झाला. हे कर्ज २०१३ साली उचलले असून २०१७ साली शेतकऱ्यांच्या परस्पर रिनिव्यू केलेले आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी ९०० शेतकऱ्यांना या कर्जा संदर्भात नोटीस आलेल्या आहेत. उरलेल्या ६०० शेतकऱ्यांना नोटीस पाठवणार आहोत असे बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील शेतकरी भांबावून गेला असून शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत.

याप्रसंगी आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेवून पंजाब नॅशनल बँक, शाखा- अरोरा टॉवर, एम.जी. रोड, pune-१ येथे बुधवार दि. १६/ ०६/ २०२१ रोजी हलगी वाजवून भिक मांगो आंदोलन करुन त्यातून जमा झालेली निम्मी भिक बँकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्त करणार आहोत तसेच निम्मी भिक करमाळयाचे आ. संजयमामा शिंदे यांना पाठविणार आहोत. शेतकऱ्यांवर कर्ज काढून जर त्यांना कमी पडत असेल तर आणखी भिक मागून घ्या, म्हणून भिक मागायचे आंदोलन करणार आहोत. त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना अशीच छळवणूक केलेली आहे.

 

आ.संजय शिंदे यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

 

स्वत:च्या फायद्यासाठी मौजमजा करण्यासाठी फॉर्म हाऊस बनविणे, १०० एकर जमीन यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर, पुणे या कारखान्याची घेवून हजारो एकराची संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे. म्हणून त्यांच्या संपत्तीची चौकशी ईडी मार्फत व्हावी, यासाठी ईडी कार्यालयातही एक प्रत देण्यात येणार आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी, पुणे, मा. पोलीस आयुक्त, पुणे मा. साखर आयुक्त, पुणे. मा. शाखाधिकारी, पंजाब नॅशनल बँक मंडळ, अरोरा टॉवर,पुणे-१ व मा. विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगांव, ता.माढा, जि. सोलापूर यांचेकडे रितसर तक्रार पाठविलेली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे उचलेले कर्ज लोकसभा, विधानसभा लढविण्यासाठी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी घोडेबाजारासाठी घालविण्यात आलेले आहेत. प्रॉपर्टीची चौकशी करण्याची आम्ही मागणी करीत आहोत. येणाऱ्या बुधवार हलगी वाजवून भिक मांगो आंदोलन करणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यावर व करमाळयाच्या कारखान्याचे सर्वेसवा असणारे चेअरमन आणि शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close