-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

आ.संजय मामा शिंदे यांच्या हस्ते कोळगाव येथील ट्रांसफार्मरचे उद्घाटन; माजी आ.जयवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील २०१७ पासून बंद असलेल्या कोळगाव सबस्टेशन मधील 3.15 MVA नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामाचे उद्घाटन आज आ. संजयमामा शिंदे (विधानसभा सदस्य करमाळा- माढा) यांच्या शुभहस्ते व माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कोळगाव येथील हा ट्रान्सफर बंद झाल्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना फक्त ४ तास वीज पुरवठा होत होता. हा नवीन ट्रांसफार्मर बसविल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने ८ तास वीज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

यावेळी मा. संतोष सांगळे (अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.क सोलापूर), मा. सुरेश कुऱ्हाडे (कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क विभागीय कार्यालय बार्शी), जेऊर विभागाचे उपअभियंता काळे, करमाळा विभागाचे उप अभियंता जाधव तसेच उद्धव दादा माळी, वामनदादा बदे, तानाजी झोळ, मानसिंग खंडागळे, भरत अवताडे, सुजित बागल, विवेक येवले, नानासाहेब नीळ, राजेंद्र बाबर, ॲड. अजित विघ्ने, सुभाष हानपुडे, फिरोज जागीरदार, सिद्धेश्वर जगदाळे, उमेश मगर, प्रदीप दौंड, जयराम शिंदे व पूर्व भागातील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close