-->
महिलाविषयकविशेषसामाजिक

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटांचे मेळावे घेणार : सरपंच हेमलता शिंदे

 

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून आर्थिक दृष्ट्या महिलांना स्वतः पायावर उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध शासकीय प्रशिक्षण शिबिरे, बचत गटाचे मेळावे भविष्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच हेमलता विलास शिंदे यांनी सांगितले.

 

 

वडगाव शिंदे, ता. हवेली येथे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी महिलांना डिजिटल ८ अ वाटप, श्रम कार्ड, ० ते ५ वयोगटातील मुलांचे आधारकार्ड, आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे कार्ड वाटप तर यावेळी विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सरपंच हेमलता शिंदे यांच्या समवेत इतर महिलांनी बचत गटांच्या ग्रामसंघात सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ही विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. गावातील विविध विषयांवर चर्चा करत असताना महिलांना, बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

यावेळी १५० लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच हेमलता विलास शिंदे, उपसरपंच योगिता शिंदे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, माजी उपसरपंच उषा काकडे, युवराज काकडे, बाळासाहेब काकडे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दीपाली शिंदे, संगीता काकडे, अशोक काकडे, अनिल काकडे, अविनाश गायकवाड यांच्यासह माजी सरपंच भरत काकडे, उद्योजक कल्याण आबा शिंदे, स्वप्नील शिंदे, वैभव शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, पंडित वारघडे आदी मान्यवर, ग्रामस्थ व सुमारे ३०० महिला यावेळी उपस्थित होत्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close